EVENT

एम. बी. पाटील यांना मंत्रीपद मिळाल्याने बसवभूमीमध्ये जल्लोष

Share

काँग्रेस पक्षाची सत्ता आल्यानंतर नव्या मंत्रिमंडळात एम. बी. पाटील यांना मंत्रीपद मिळाल्याने बसवभूमीमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी विजयाचा जल्लोष केला.


शनिवारी विजापूर शहरातील बसस्थानक व गांधीचौक येथे काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाके फोडून विजयोत्सव साजरा केला. आज बेंगळूर येथे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि शिवकुमारांसह एम.बी.पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी सिद्धरामय्या व एम.बी.पाटील यांच्यावतीने घोषणाबाजी करून आनंद व्यक्त केला. यावेळी कार्यकर्त्यांनी मिठाई वाटून आनंद व्यक्त केला. यावेळी फयाज कलादगी, अक्रम माशाळकर यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.

Tags: