Belagavi

मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा बेळगावातच व्हावा : करवेची मागणी

Share

बेळगावचे सुवर्णविधानसौध हे उत्तर कर्नाटकातील सत्ताकेंद्र व या भागाच्या विकासाचे होकायंत्र असून मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा येथेच व्हावा, अशी मागणी कर्नाटक रक्षण वेदिकेचे जिल्हाध्यक्ष दीपक गुडगनट्टी यांनी केली आहे.

काँग्रेस पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. त्यांच्या या यशात उत्तर कर्नाटकचीही भागीदारी आहे. त्यामुळे नवे मुख्यमंत्री आणि या राज्याच्या मंत्रिमंडळात सामील होणाऱ्यांनी सुवर्णसौधच्या अंगणात शपथ घेऊन नवा इतिहास घडवावा, अशी आग्रहाची विनंती आहे.

बेळगावातील सुवर्णविधान सौधसमोर शपथविधी सोहळा पार पडला तर नवे सरकार उत्तर कर्नाटकाला न्याय देईल, असे बेळगावचे करवे जिल्हाध्यक्ष दीपक गुडगनट्टी यांनी सांगितले. बेळगावच्या सुवर्ण विधानसभेसमोर मोठे प्रांगण असून, तेथे सुमारे दोन लाख लोकांना बसण्यासाठी योग्य जागा आहे. कंठीरव स्टेडियमवर कोट्यवधी रुपये खर्च करण्याऐवजी शपथविधी सोहळा बेळगावच्या सुवर्ण विधानसौधमध्येच व्हावा, अशी मागणी दीपक गुडगनट्टी यांनी केली.

Tags: