Belagavi

सतीश जारकीहोळींना उपमुख्यमंत्री करा : मागणीसाठी समर्थकांची बेळगावात निदर्शने

Share

केपीसीसी कार्याध्यक्ष आ. सतीश जारकीहोळी यांनी राज्यात काँग्रेसला विजयी करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची नोंद घेऊन त्यांना उपमुख्यमंत्री पद द्यावे अशी मागणी त्यांच्या समर्थकांनी केली आहे. बुधवारी या मागणीसाठी त्यांनी चन्नम्मा चौकात जारकीहोळींचे फोटो घेऊन निदर्शने केली.


नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष राज्यात 135 जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवून सत्तेत आला आहे. पक्षाच्या या विजयासाठी सतीश जारकीहोळी यांनी दिवसरात्र परिश्रम घेऊन मोठे योगदान दिले आहे. त्याची जाणीव ठेवून त्यांना उपमुख्यमंत्री करा अशी मागणी त्यांच्या समर्थकांनी केली. शहरातील चन्नम्मा सर्कल येथे हातात पक्षध्वज आणि सतीश जारकीहोळी यांचे फोटो घेऊन घोषणा देत काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. त्यानंतर सतीश जारकीहोळी उपमुख्यमंत्री पद देण्याच्या मागणीचे निवेदन देण्यात आले.

यावेळी बोलताना सतीश जारकीहोळी यांचे कट्टर समर्थक सुरेश गुरन्नावर यांनी सांगितले की, कर्नाटकात आज काँग्रेस संपूर्ण बहुमताने विजयी झाला आहे. पक्षाच्या या यशात कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांचा मोठा वाटा आहे. पक्ष सत्तेत यावा यासाठी त्यांनी दिवसरात्र एक करत त्यांनी राज्यात काँग्रेसचा प्रचार केला आहे. त्यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेऊन पक्षनेते सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सतीश जारकीहोळी यांना उपमुख्यमंत्रीपद देण्याचा आग्रह त्यांनी केला.

या आंदोलनात सर्व जाती-धर्माचे धर्मगुरू, ज्येष्ठ नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Tags: