Belagavi

बेळगाव स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या योजनेचा कालावधी संपत आला तरी कामे पूर्ण होत नसल्याने लोक कंटाळले आहेत.

Share

बेळगाव स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या योजनेचा कालावधी संपत आला तरी कामे पूर्ण होत नसल्याने लोक कंटाळले आहेत.


बेळगाव शहरासाठी , स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत रस्त्यांच्या विकासाला प्रथम महत्त्व देण्यात आले आहे. फुटपाथ वीज, उद्याने असे अनेक प्रकल्प शहराला दिले आहेत.

एकीकडे शहर स्वच्छ, सुंदर आणि हिरवेगार करण्यासाठी प्रकल्प तयार करण्यात आले आहेत.परंतु त्याचा शहरातील नागरिकांकडून योग्य वापर होत नसल्याची खंत आहे.त्यासाठी ठिकठिकाणी झाडांसाठ कुंड्या बसविण्यात आल्या आहेत. शहर स्वच्छ आणि हिरवेगार ठेवण्यासाठी झाडे लावण्यात आली मात्रमहानगर पालिका देखील याकडे लक्ष देत नसल्याचे दिसून येत आहे, योग्य देखभालीअभावी त्यामध्ये एकही झाडे उगवत नाहीत, अशी निकृष्ट कामे केली जात आहेत .
एकंदरीतच स्मार्ट सिटी हे अशा प्रकल्पांच्या विकासाची नांदी असून लोकांनी सहकार्य केले तर कोणताही विकास शक्य आहे

Tags: