जॉननाथन फाउंडेशनच्यावतीने वडगाव, बाळकृष्णनगर येथे मातृदिन साजरा करण्यात आला.कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. अरुणा महेंद्रकर उपस्थित होत्या. व्यासपीठावर जॉननाथन फाउंडेशनच्या लीना वेगस, ऍना डिसोझा, भक्ती शिंदे, शारदा दिवटे वेरोनिटा रोड्रीग्ज, क्लारास्वामी उपस्थित होते.


पाहुण्यांच्या हस्ते केक कापून मातृदिन साजरा करण्यात आला.यावेळी बोलताना डॉ. अरुणा महिंद्रकर यांनी आईचे महत्व आणि आईच्या आरोग्याविषयी काळजी घेण्यासंदर्भात विवेचन केले.मातृ दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी संगीत खुर्ची व इतर स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस देण्यात आले. कार्यक्रमाला परिसरातील महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या.


Recent Comments