Belagavi

विकासाच्या नावाखाली कणबर्गी बसस्टॉप रस्ता ठेवला खोदून

Share

बेळगावच्या कणबर्गी गावात प्रवेश करतानाचा मुख्य रस्ता गेल्या तीन महिन्यांपासून पूर्ण होण्याच्या प्रतीक्षेत आहे . या रस्त्याच्या अर्धवट कामकाज तर इथल्या वाहनधारकांसहित , पादचाऱ्यांना होत आहे . त्यामुळे इथले लोक , तीव्र संताप व्यक्त करीत आहेत .


कणबर्गी गावातील ह्या रस्त्याचे विकास काम हाती घेऊन तीन महिने उलटले आहेत . जेसीबीने हा रस्ता उखडून टाकण्यात आला आहे . त्यामुळे या रस्त्यावरून ये जा करणे मुश्किल झाले आहे . शिवाय खराब रस्त्यामुळे अनेक जण पडून जखमी झाले आहेत .

याबद्दल माहिती देताना , एका रिक्षाचालकाने या खराब रस्त्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त करीत सांगितले कि , या खराब रस्त्यामुळे , सर्वानाच त्रास होत आहे . आमच्या रिक्षाचे तयार खराब होत आहे . पँसेंजर आम्हाला बडबडतात . निवडणुकीच्या आधी हा रस्ता करण्याचे सांगितले होते पण आता निवडणूक संपून निकाल लागला तरी याकडे कोणी अधिकारी किंवा संबंधित लोकप्रतिनिधी लक्ष द्यायला तयार नाहीत, ही कणबर्गी आहे कि झोपडपट्टी अशी नाराजी व्यक्त केली . (बाईट )
तर इथल्या एका स्थानिकाने सांगितले कि , मागील तीन महिन्यांपासून आम्हाला या रस्त्याचा त्रास सहन करावा लागत आहे . जेसीबीने हा रस्ता खोदून ठेवला आहे . महिला, लहान मुले,वृद्ध तसेच जनावरांना देखील या रस्त्यावरून जाताना त्रास होत आहे . अनेक जण या रस्त्यावरून पडून जखमी झाले आहेत . आम्हाला लवकरात लवकर हा रस्ता करून द्यावा अशी मागणी त्यांनी केली .

तर अशोकसिंग राजपूत नामक दुकानदाराने सांगितले कि , मागील बऱ्याच दिवसांपासून हा रस्ता असाच पडला आहे . महिला वाहनधारक, या रस्त्यावरून जाताना दुचाकीवरून पडून जखमी झाल्या आहेत . लवकरात लवकर हा रस्ता करावा अशी मागणी त्यांनी केली . तर आणखी एका रहिवाशाने सांगितले कि , सिद्धेश्वर मंदिराला जाणारा हा रस्ता आहे . ह्या रस्त्याची परिस्थिती पाहता आधीच रस्ता बरा म्हणण्याची वेळ आली आहे . संबंधितांनी लक्ष देऊन हा रस्ता तातडीने करून द्यावा असे ते म्हणाले .
एकंदर , निवडणुकीच्या आधी मते मिळवण्याच्या दृष्टीने , विकास कामे हाती घेऊन , निवडणुकीचे कारण देऊन ती तशीच अर्धवट अवस्थेत ठेवण्यात आली आहेत . घिसाडघाई करून जनतेची मते मिळण्यासाठी , विकासकामांचे गाजर दाखवून, आता रस्ते विकासाकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे . याचाच फटका कणबर्गी वासियांना बसत आहे . संबंधितांनी याची दखल घेऊन, सदर अर्धवट रस्त्याचे कामकाज पूर्ण करावे अशी मागणी कणबर्गीवासिय करीत आहेत .

Tags: