Belagavi

आपल्या विरोधात फेक व्हिडीओ होत आहे वायरल : आसिफ सेठ

Share

 

आरपीडी क्रॉसवरील जो व्हिडीओ वायरल केला जात आहे तो फेक आहे . याची चौकशी करण्यात येईल , यासाठी कडक पावले उचलणार आहे असे काँग्रेसचे नवनिर्वाचित आमदार ,आसिफ उर्फ राजू सेठ यांनी सांगितले .

व्हॉईस ओव्हर : त्यांनी यावेळी आपली सर्व टीम , समर्थक , आणि जनतेने त्यांना विश्वासाने निवडून दिल्याबद्दल सर्वाना धन्यवाद दिले . मी सैदव तुमच्या सोबत आहे , तुमची सर्व कामे मी करेन तसेच विकासाच्या बाबतीत मी कोणताही वॉर्ड , गल्ली , मोहल्ला असा भेदभाव करणार नाही .

जो व्हिडीओ वायरल होत आहे तो फेक आहे . तुम्हाला जर असे व्हिडीओ येत असतील तर ते फॉरवर्ड करू नका . माझा देश महान आहे . मी सर्व जातीधर्माना सोबत घेऊन जाणारा व्यक्ती आहे . जो कोणी असे फेक व्हिडीओ वायरल करीत आहे त्याच्यावर कडक कारवाई व्हावी यासाठी पावले उचलणार आहे असे त्यांनी सांगितले .

Tags: