Athani

लक्ष्मण सवदी टॉप-3 मध्ये; मतदारांचे मानले आभार

Share

ऐन निवडणुकीपूर्वी भाजपला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या लक्ष्मण सवदी यांनी अथणी हा आपला अभेद्य बालेकिल्ला असल्याचे सिद्ध केले आहे. सर्वाधिक मते घेणाऱ्या टॉप-3 आमदारांमध्ये त्यांचा समावेश झाला असून त्याबद्दल त्यांनी मतदारांचे आणि काँग्रेस नेत्यांचे आभार मानले आहेत.
निकाल हाती आल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना लक्ष्मण सवदी यांनी मतदार, पक्ष कार्यकर्ते आणि नेत्यांमुळे आपण 76 हजार इतक्या विक्रमी मतांनी विजयी होऊ शकलो, गोरगरीब, शेतकरी आणि लोकांचा आशीर्वाद मला लाभला. त्याबद्दल त्या सर्वांचा मी आभारी आहे अशी प्रतिक्रिया दिली. मी भाजप सोडून जावे असे वातावरण काहींनी निर्माण केल्याने मी भाजपचा त्याग केला. त्यावेळी काँग्रेसने मला प्रेमाने जवळ केले. माझे स्वागत करून उमेदवारी दिली. माझ्या विजयासाठी प्रयत्न केले. त्यामुळे मी काँग्रेस नेत्यांचे आभार मानतो असे सवदी यांनी सांगितले. मंत्री-उपमुख्यमंत्री होणार का? या प्रश्नावर अजून तसा विचार केलेला नाही, आतापर्यंत मंत्रीपदे भोगली आहेत. आता मतदारसंघाच्या विकासाला सर्वाधिक प्राधान्य देणार आहे असे ते म्हणाले. कागवाड तसेच कुडची मतदारसंघाची जबाबदारी काँग्रेसने दिली होती. दोन्ही ठिकाणी पक्षाचे उमेदवार निवडून आले. त्याबद्दल तेथील जनतेचे आभार मानतो असेही सवदी यांनी सांगितले. माजी मुख्यमंती जगदीश शेट्टर यांचा पराभव झाल्याचे दुःख आहे. तेथे भाजपनं पैशांचा महापूर आणल्याने त्यांचा पराभव झाल्याचा आरोप त्यांनी केला.
एकंदर, आपल्या विजयात मतदार, कार्यकर्ते आणि काँग्रेस नेत्यांचे योगदान असल्याचे सवदी यांनी म्हटले आहे.

Tags: