जनतेच्या कायम संपर्कात राहिलो आणि जनतेच्या आशीर्वादाने विजयी झाल्याचे कागवाड काँग्रेसचे विजयी उमेदवार राजू कागे यांनी सांगितले.

राज्याच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणीत , काँग्रेसने आपली आघाडी कायम ठेवली आहे.
कागवाड विधानसभा मतदार संघाचे काँग्रेसचे उमेदवार राजू कागे यांनी विजयी झाल्यावर शहरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की, माझा हा पाचवा विजय असून जनतेच्या सततच्या सहवासामुळे जनतेने मला आशीर्वाद दिले आहेत.मतदारसंघाचा विकास हेच आमचे ध्येय आहे. महाराष्ट्र सीमेवरील आमचा मतदारसंघ अतिशय मागासलेला असून, सिंचनापासून वंचित गावे आहेत. मतदारसंघाच्या विकासावर अधिक भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले . (बाईट )


Recent Comments