Belagavi

बेळगाव ग्रामीण मतदारसंघात हेब्बाळकर 37585 मतांनी आघाडीवर

Share

बेळगाव ग्रामीण मतदार संघात विद्यमान आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी मोठी आघाडी घेतली आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार त्यांना 74099 मते मिळाली आहेत. विशेष म्हणजे मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच त्यांनी आघाडी कायम राखली आहे. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी 19व्या फेरीतही 37585 मतांनी आघाडी कायम राखली. महाराष्ट्र एकीकरण समितीचे आर. एम. चौगुले 34026 मतांनी दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
या मतदार संघातील मतमोजणीची 19 व्या फेरीची सध्याची आकडेवारी अशी :
लक्ष्मी हेब्बाळकर (काँग्रेस) 74099
आर. एम. चौगुले (म. ए. समिती) 36514
नागेश मन्नोळकर (भाजप) 29574

Tags: