खानापूर मतदार संघाची मतमोजणीची 14वी फेरी पूर्ण झाली असून भाजपचे उमेदवार विठ्ठल हलगेकर विक्रमी मतांनी आघाडीवर असून त्यांचा विजय निश्चित आहे. आपल्या निकटच्या प्रतिस्पर्धी काँग्रेसच्या अंजली निंबाळकर यांच्यावर त्यांनी 39373 मतांची भली मोठी आघाडी घेतली आहे. 14व्या फेरीअखेर हलगेकर यांना 59597 तर काँग्रेसच्या अंजली निंबाळकर यांना 20224 मते मिळाली आहेत. जेडीएसचे नासिर बागवान यांना केवळ 5745 मते मिळाली आहेत.



Recent Comments