बेळगावजवळील न्यू वंटमुरी येथील श्रीदेवी दशरथ हरिजन ही 18 वर्षीय युवती बेपत्ता झाली आहे. याबाबत तिच्या वडिलांनी काकती पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून तिचा ठावठिकाणा लागल्यास कळविण्याचे आवाहन काकती पोलिसांनी केले आहे.

श्रीदेवी 9 मे रोजी सकाळी 6 ते 7 वाजण्याच्या दरम्यान घरातून बाहेर पडली ती अद्याप परतलेली नाही. ती पीयूसी प्रथम वर्षात शिकते. तिची शरीरयष्टी सडपातळ, उंची 5 फूट 4 इंच असून गहूवर्णीय आहे. तिने चुडीदार परिधान केला आहे. तिच्याविषयी माहिती मिळाल्यास, काकती पोलीस स्थानक क्र. 0831-2405203, 9480804115 बेळगाव पोलीस कंट्रोल रूम क्र. 0831-2405233 वर संपर्क साधून कळविण्याचे आवाहन काकती पोलिसांनी केले आहे.


Recent Comments