Belagavi

पराभवाच्या भीतीने रमेश जारकीहोळींचे आरोप : चन्नराज हट्टीहोळी

Share

पराभवाच्या भीतीने रमेश जारकीहोळी यांनी खोटेनाटे आरोप सुरू केले आहेत. केपीसीसी अध्यक्ष डिके शिवकुमार यांच्यावर ब्लॅकमेल केल्याच्या आरोपाचे पुरावे त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर सादर करावेत असे खुले आव्हान विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी दिले.

डीकेशिनी आपल्याला काल रात्री साडेबाराच्या सुमारास फोन करून धमकी देत ब्लॅकमेल केल्याचा आरोप रमेश जारकीहोळी यांनी आज सकाळी केला होता. त्यावर आज सायंकाळी पत्रकार परिषदेत चन्नराज हट्टीहोळी यांनी ठोस प्रत्युत्तर देतानाच पुरावे आहेत तर सादर करा असे आव्हान दिले. रमेश यांचा गोकाकमध्ये पराभव होणार आहेच, त्याशिवाय त्यांनी लुडबुड केलेल्या अथणी, कागवाड आणि बेळगाव ग्रामीण मतदारसंघातही त्यांच्या चेल्यांचा पराभव होणार हे

आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच पराभवाच्या भीतीने ते खोटे आरोप करत आहेत. डीकेशिनी ब्लॅकमेल केले असेल तर रमेश यांनी त्या कॉलचे रेकॉर्डिंग किंवा स्क्रीन शॉट काढून तो पुरावा प्रसारमाध्यमांसमोर सादर करावा असे आव्हान दिले.

रमेश खोटारडे आहेत हे यापूर्वी सिद्ध झाले आहेच चामुंडेश्वरी देवीची शपथ घेऊन सीडी प्रकरणात मी नव्हतो असे सांगणाऱ्या रमेश यांनी नंतर त्या सीडीमध्ये मीच होतो अशी जाहीर कबुली दिली होती. त्यांची विश्वासार्हता काय असा सवाल त्यांनी केला. रमेश जारकीहोळी यांनी कितीही खोटेनाटे आरोप केले, आगळीक केली तरी बेळगाव ग्रामीणमध्ये आ. लक्ष्मी हेब्बाळकर या विजयी होणारच ही काळ्या दगडावरची रेघ असल्याचे हट्टीहोळी यांनी सांगितले.

Tags: