election

सीडीवरून डीकेशींकडून काल रात्रीपासून ब्लॅकमेल : रमेश जारकीहोळी यांचा नवा बॉम्ब

Share

केपीसीसी अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी काल रात्री 12.30 वाजल्यापासूनच सीडी जारी करतो, असे सांगून ब्लॅक मेल सुरू केल्याचा नवा बॉम्ब माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी फोडला आहे.

गोकाक येथे आज ऐन मतदानाच्या दिवशीच माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी नवा बॉम्ब फोडला. प्रसारमाध्यमांशी बोलताना, डीकेशिनी मला ब्लॅकमेल केले, जर तुम्ही बेळगाव ग्रामीण मतदार संघातून बाजूला झाला नाहीत तर तुम्हाला सोडणार नाही असे धमकावत त्यांनी ब्लॅकमेल केल्याचा आरोप रमेश जारकीहोळी यांनी केला.

भाजप हायकमांडने माझ्यावर विश्वास ठेवला आहे. मी आता राज्याच्या पुढील मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना सीडी प्रकरण सीबीआयकडे सोपवा असे आवाहन करतो. सीडी प्रकरण सीबीआयकडे सोपवले तर सगळे बाहेर येईल. निवडणुकीच्या काळात सीडी प्रकरण सीबीआयकडे सोपवले तर भाजप त्यांना ब्लॅकमेल करते असा संदेश जाईल अशी हितचिंतकांनी एक सूचना मांडली. त्यामुळे सध्या गप्प आहे.

 

आणखी एका महिन्यात सीडी प्रकरण सीबीआयच्या ताब्यात द्यावे, असा आग्रह धरणार आहे. मी एकटा नाही, मी बाहेर आलो आहे. सीडी कटात आणखी शेकडो लोक अडकले आहेत, मी त्यांना बाहेर काढेन. फक्त सीडीची चौकशी करायला लावणार आहे. सीडी गँग त्या सर्वांना ब्लॅकमेल करत आहे. मी आणि डीकेशी चांगले मित्र होतो. पण डीकेशी त्या विषकन्येच्या जाळ्यातून बाहेर पडणे चांगले आहे अशी टीका त्यांनी केली. बाईट

Tags: