Belagavi

राज्यात भाजपचे सरकार, बेळगावमध्ये भाजप आमदारांचा दरबार : आ. अभय पाटील

Share

बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी आज होसूर येथील सरकारी मराठी शाळेतील मतदान केंद्रावर कुटुंबियांसमवेत जाऊन मतदान केले. यावेळीही राज्यात भाजपचे सरकार, अन बेळगावमध्ये भाजप आमदारांचा दरबार असेल अशा शब्दांत आ. अभय पाटील यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला.

बेळगाव दक्षिण मतदार संघातील होसूर येथील आपल्या निवासस्थानाजवळील मराठी शाळेतील मतदान केंद्रात कुटुंबियांसमवेत जाऊन आ. अभय पाटील यांनी मतदान केले.

त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी, बेळगाव दक्षिण आणि उत्तरामध्ये भाजपचेच उमेदवार निवडून येईल, यावेळी राज्यात भाजपचे सरकार अन बेळगावमध्ये भाजप आमदारांचा दरबार असेल अशा शब्दांत आ. अभय पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. गेल्यावेळी आपण ५८ हजार मताधिक्क्याने निवडून आलो होतो. यावेळी ७५ हजारहून अधिक मताधिक्क्याने निवडून येईन असा विजयाचा विश्वास व्यक्त केला. खासबाग येथील एका घरात दारूच्या बाटल्या आणि भाजपची प्रचारपत्रके टाकण्याचे काम विरोधकांनीच केले असल्याचा आरोप त्यांनी केला. दारूच्या पॅकेट्ससोबत भाजपची हॅंडबिल्स मिळाली म्हणजे ते काम भाजपने केले म्हणता येणार नाही.

 

गेल्या आठवड्यापासून आपले विरोधक दक्षिणमध्ये बिहारसारखी परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना जनताच उत्तर देईल. अमित शाह यांच्या रोड शोला लाभलेल्या प्रतिसादाने त्यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे असा आरोप त्यांनी केला. काँग्रेस आणि समिती दोघे मिळून तुमचा पराभव करू पाहताहेत का या प्रश्नावर, हे उघड गुपित आहे. दक्षिणमध्ये काँग्रेसचे अस्तित्वच नाही. त्यामुळे जे कोणी त्यांचे किरकोळ समर्थक आहेत त्यांना ते समितीला विजयी करा असे सांगत सुटले आहेत. या निवडणुकीत दक्षिणमधून काँग्रेस मुळासकट उखडली जाईल. मतदार संघातील लाखो लोक माझ्या बाजूने आहेत. दोघातिघांच्या विरोधाने काही फरक पडणार नाही असा दावा त्यांनी केला.

यावेळी आ. अभय पाटील यांच्या पत्नी व कुटुंबीय उपस्थित होते.

Tags: