बेळगावच्या खासदार मंगल अंगडी यांनी आज सदाशिवनगरातील सरकारी शाळेतील मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला.
विधानसभा निवडणुकीसाठी आज सकाळी ७ वाजता मतदानाला प्रारंभ झाला. खा. मंगल अंगडी यांनी बेळगावातील सदाशिवनगरातील सरकारी कन्नड शाळेत कुटुंबियांसमवेत जाऊन मतदान केले.
मतदान केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना खा. मंगल अंगडी यांनी घटनेने दिलेला मतदानाचा हक्क आपण बजावला असून, सर्वानी तो बजावून मतदान करावे असे आवाहन केले.
राज्यात भाजप सरकार पुन्हा सत्तेत येईल, बेळगाव जिल्ह्यात पक्षाला किमान १३ ते १४ जागा नक्की मिळतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आपले व्याही जगदीश शेट्टर काँग्रेसमध्ये गेले असले तरी, आपण भाजपमध्येच कायम राहणार असल्याचे खा. अंगडी यांनी यावेळी स्पष्ट केले.


Recent Comments