बेळगाव उत्तर मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार आसिफ उर्फ राजू सेठ यांनी आपल्या कुटुंबियांसोबत मतदान केंद्रावर जाऊन रांगेत थांबून मतदान केले .
कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीतही आज मतदान होत आहे . सकाळी ७ वाजल्यापासूनच मतदानाला सुरुवात झाली . बेळगाव उत्तर मतदार संघाचे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आसिफ उर्फ राजू सेठ यांनी आपल्या कुटुंबियांसोबत मतदान केंद्रावर जाऊन , आपला मतदानाचा हक्क बजावला .
यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना , आसिफ उर्फ राजू सेठ म्हणाले कि , मतदानाचा हक्क पार पाडला आहे . संविधानाने दिलेला मतदानाचा हक्क सर्वांचा अधिकार आहे . सर्वानी न चुका मतदान करा . मला प्रचाराच्या आधी आणि नंतर देखील मतदारांकडून चांगला पाठिंबा लाभत आहे . विजयी होण्याची खात्री आहे . सर्व जातीधर्माचे , सर्व भाषिक लोकांनी पाठिंबा दर्शवला आहे . जनता जनार्दन मला साथ देईल याची खात्री आहे असे ते म्हणाले .
यावेळी , आसिफ उर्फ राजू सेठ यांचे कुटुंबीय उपस्थित होते .


Recent Comments