Belagavi

भाजपचे उमेदवार डॉ . रवी पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क , १०० % विजयी होण्याची खात्री

Share

बेळगाव उत्तर मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार डॉ . रवी पाटील यांनी मतदान केंद्रावर जाऊन रांगेत थांबून मतदान केले .

कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीतही आज मतदान होत आहे . सकाळी ७ वाजल्यापासूनच मतदानाला सुरुवात झाली . बेळगाव उत्तर मतदार संघाचे भाजपचे अधिकृत उमेदवार डॉ . रवी पाटील यांनी मतदान केंद्रावर जाऊन , आपला मतदानाचा हक्क बजावला

यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना , डॉ . रवी पाटील म्हणाले कि , मतदान करून आनंद वाटला . प्रथमच मतदान केंद्रावर मतदानासाठी एवढी गर्दी पाहत आहे . मतदारांकडून चांगला पाठिंबा लाभत आहे . १०० % विजयी होण्याची खात्री आहे . पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि , मुख्यमंत्री बोम्मई सरकारने केलेली विकास कामे , आणि वरिष्ठांच्या आणि जनतेच्या आशीर्वादाने आपण नक्की विजयी होऊ असे सांगितले . तीस हजार मतांच्या फरकाने आपण विजयी होऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला .

यावेळी त्यांचे समर्थक मोठ्या संख्येनें उपस्थित होते .

Tags: