Belagavi

मी भाजप पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता : डॉ प्रभाकर कोरे

Share

मी भाजप पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता असून , मी मोदींचा कट्टर समर्थक आहे . मी अन्य पक्षाला समर्थन देत आहे ही अफवा पसरवली जात असून , कोणीही ह्या अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन माजी राज्यसभा सदस्य डॉ प्रभाकर कोरे यांनी केले .

माजी राज्यसभा सदस्य डॉ .प्रभाकर कोरे हे अन्य पक्षाला अप्रत्यक्ष रित्या पाठिंबा दर्शवत असल्याची अफवा पसरवण्यात आली आहे . याबद्दल डॉ .प्रभाकर कोरे यांनी प्रतिक्रिया दिली .

ते म्हणाले कि माझ्याबद्दल चुकीची अफवा पसरवण्यात आली आहे . मी कधीच पक्षविरोधी काम करणार नाही मी पक्षाचा निष्ठावंत कार्यकता आणि मोदींचा कट्टर समर्थक आहे .

हे लक्षात घेऊन लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू असे आवाहन त्यांनी केले . ( )

Tags: