election

काँग्रेसला ही निवडणूक सोपी नाही, त्यांची हार निश्चित : बोम्मई

Share

राज्यात सर्वत्र भाजपला अनुकूल वातावरण आहे. त्यामुळे सहज बहुमताने भाजप आरामात सत्तेत येईल. काँग्रेसला वाटते तितकी सोपी ही निवडणूक नाही, त्यांचा पराभव निश्चित आहे असा दावा मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केला.
आपल्या शिग्गावी मतदारसंघात मुख्यमंत्री बोम्मई यांनी आज विविध तांड्याना भेटी देऊन मतयाचना केली. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, भाजप सरकारने राज्यात केलेल्या विकासकामांमुळे लोक खुश आहेत.

 

भाजपला मतदान करण्यासाठी लोक उत्सुक आहेत. त्यांचा उत्साह पाहता एखादा सण आहे असे वातावरण निर्माण झाल्याचे दिसतेय. पंतप्रधान मोदींवर लोकांचा विश्वास आहे. विकास आणि मोदी यामुळे भाजपला फायदा होईल. आमचा पक्ष कार्यकर्त्यांवर आधारित पक्ष आहे. काँग्रेसमध्ये एकी नाही, सिद्दरामय्या-डीकेशी यांचे जमत नाही. तसे नसल्याचे भासवण्याचा प्रयत्न ते करत आहेत. त्यामुळे काँग्रेस पुन्हा एकदा हरणार हे निश्चित आहे. आम्ही राज्यात अद्भुत प्रचार केला आहे. आम्हाला अनुकूल वातावरण आहे. आम्ही आरामात बहुमत मिळवून पुन्हा सत्तेत येऊ. असा दावा बोम्मई यांनी केला.

आपल्या शिग्गावी मतदारसंघात असो किंवा संपूर्ण राज्यात, लोकांच्या संपर्कात मी कायमच आहे. मला ते आवडते. शिग्गावी मतदारसंघातील लमाणी तांड्याना भेटी देऊन मतदारांना भेटून प्रचार केला आहे. त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या आहेत. उद्या सकाळी लवकर कुटुंबियांसमवेत मतदान करणार आहे असेही मुख्यमंत्री बोम्मई यांनी सांगितले

एकंदर राज्यात भाजप आरामात पुन्हा सत्तेत येईल आणि काँग्रेसचा पराभव होईल असा विश्वास मुख्यमंत्री बोम्मई यांनी निवडणुकीच्या पूर्वसंध्येला व्यक्त केला आहे.

Tags: