बेळगाव उत्तर मतदार संघाचे आम आदमी पक्षाचे उमेदवार राजकुमार टोपण्णावर यांनी बेळगावच्या सर्वसामान्य जनतेच्या समस्या , शहरी समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आपण ही निवडणुकीत लढवत असल्याचे सांगितले .


बेळगाव उत्तर मतदार संघाचे आम आदमी पक्षाचे उमेदवार राजकुमार टोपण्णावर यांनी मतदारसंघातील जनतेच्या घरोघरी जाऊन, त्यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क साधून , त्यांच्या काय समस्या आहेत त्या जाणून घेतल्या . त्या दृष्टिकोनातून , आपण कोणते प्रयत्न करणार आहोत हे आहोत हे मीडियासमोर स्पष्ट केले .
बेळगावच्या नागरिकांच्या नेमक्या समस्या काय आहेत आणि त्या तुम्ही कशाप्रकारे सोडवणार या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले कि, इथल्या तरुणांना रोजगार नाही , त्यासाठी रोजगार निर्मितीसाठी पावले उचलणार आहे . स्टार्टअप च्या दृष्टीने प्रयत्न करणार आहे . गोरगरीब जनतेला घरे मिळवून देण्यासाठी , कमी दरात लॉटरी पद्धतीने घरांची सुविधा मिळवून देणार आहे . त्याचप्रमाणे , पिण्याचे पाणी , ड्रेनेज समस्या सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले .
शहरात मुख्यत्वे , पार्किंग आणि ट्राफिक जामच्या समस्यां आहे . ह्या समस्या सोडवण्यासाठी शहरात मल्टीलेव्हल पार्किंग , तसेच ट्रक टर्मिनल उभारण्याची योजना आहे . असे सांगितले .
भाजप , काँग्रेस आणि जेडीएस उमेदवारांचा प्रचार आणि तुमचा प्रचार यात काय वेगळेपण आहे या प्रश्नाला उत्तर देताना राजकुमार टोपण्णावर म्हणले कि , स्थानिक जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी प्रत्यक्ष जनतेशी संपर्क साधला आहे . महिला आणि युवकांच्या नेमक्या काय मागण्या आहेत , व्यापाऱ्यांना काय समस्या आहेत , त्याचप्रमाणे शिक्षण आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून कोणत्या सुविधा हव्या आहेत याची माहिती घेतली . घरोघरी जाऊन मतयाचना केली आहे .
बेळगावच्या रेल्वे स्थानकाला नांगनूर मठाचे लिंगैक्य शिवबसव स्वामीजी यांचे नाव देण्यासाठी आपण लढा देणार असल्याचे टोपण्णावर यांनी सांगितले . हार जीत याचा मी विचार करीत नाही . मी या निवडणुकीत निवडून येईन अथवा नाही परंतु जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी माझा लढा सुरूच राहील असे ते म्हणाले .
एकंदर , जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी , आपण अखंड काम करणार असल्याचे राजकुमार टोपण्णावर यांनी सांगितले .


Recent Comments