Bailahongala

पंचमसाली, कुरुबा समाजाबद्दल भाजप नेत्याचे प्रक्षोभक वक्तव्य

Share

बैलहोंगल मतदारसंघातील उडकेरी गावात भाजपचे उमेदवार जगदीश मेटगुड्ड यांच्यासाठी प्रचार करताना भाजप नेते राजू बोलशेट्टी यांनी पंचमसाली आणि कुरुबा समाजाला लाथ मारून हाकलून द्या, असे अपमानास्पद विधान केले.

भाजप नेते राजू बोलशेट्टी यांनी बैलहोंगल मतदारसंघातील भाजप उमेदवार जगदीश मेटगुड्ड यांचा प्रचार करताना पंचमसाली समाज आणि कुरुबा समाजाला लाथ मारून हाकलून द्या, असे प्रक्षोभक विधान केले. जगदीश मेटगुड्ड हेसुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित असल्याने त्यांनी असे वक्तव्य करण्यास त्यांची संमती आहे का, असे लोक बोलत आहेत.

या वक्तव्याने पंचमसाली समाज आणि कुरुबा समाजाचा अपमान झाला असून, अशा लोकांना योग्य धडा शिकवायला हवा, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.

Tags: