Belagavi

बेळगाव शहरात मतदान जनजागृती: मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन

Share

बेळगाव राष्ट्रीय बसव दल आणि बसव कायक सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने मतदान जनजागृती मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते,
चन्नम्मा सर्कलपासून निघालेल्या रॅलीमध्ये सुमारे 150 दुचाकीस्वार सहभागी झाले होते . ही . रॅली शिव बसवनगर, श्रीनगर , राणी चन्नम्मा सोसायटी, रामतीर्थ नगर, ऑटो नगर,महांतेश नगर, अंजनेयनगर , विश्वगुरु बसव मंडप या ठिकाणी मतदान जागृती करण्यात आली .

याप्रसंगी राष्ट्रीय बसवराज अध्यक्ष अशोक बेंडीगेरी, आनंद गुड्स , शरणप्रसाद, विरेश उळवी, सूर्यकांत भावी , संतोष गुडस, बसवराज बोन्नावर, अनिल दलवाई , बसवराज वैजनावर, मल्लिकार्जुन, आदीं उपस्थित होते.

Tags: