Belagavi

शिवानंद मुगळीहाळ याना जनतेचा भरघोस पाठिंबा

Share

बेळगाव संघाचे जेडीएसचे उमेदवार शिवानंद मुगळीहाळ याना बेळगाव उत्तर मतदारसंघातून जनतेचा भरघोस पाठिंबा लाभत आहे .

यासंदर्भात बोलताना शिवानंद मुगळीहाळ यांनी सांगितले कि, मागील दोन महिन्यांपासून मतदारसंघातील घरोघरी जाऊन , जनतेच्या समस्या जाणून घेत जेडीएसचा प्रचार करीत आहे . जनतेला जेडीएसच्या योजनांची माहिती देत आहे . मतदारसंघातील जनतेचा मला चांगला पाठिंबा लाभत आहे . जनता भाजप आणि काँग्रेसला कंटाळली आहे . यावेळी जेडीएस पक्षाला निवडून देण्याचा निर्धार जनतेने केला आहे .

 

मागील १३ वर्षांपासून ,शेतकरी आणि जनतेला मूलभूत सुविधा मिळवून देण्यासाठी मी लढा देत आहे . जनतेच्या संपर्कात राहून कि कार्य करीत आहे . यावेळी शिवानंद मुगळीहाळ बदल घडवून आणतील असे जनता सांगत आहे असे ते म्हणाले .

तर शेतकरी नेते चुनाप्पा पुजारी यांनी बेळगाव उत्तर मतदार संघातील जनतेला आवाहन करताना
सांगितले कि , शिवानंद मुगळीहाळ हे गेल्या १३ वर्षांपासून शेतकरी आणि जनतेच्या समस्यांना प्रतिसाद देऊन त्या सोडवण्यासाठी लढा देत आहेत . त्यांना पाठिंबा देऊन निवडून द्या .

यावेळी शिवानंद मुगळीहाळ यांचे समर्थक , तसेच मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Tags: