Belagavi

40% कमिशनचे सरकार पाडण्याचा जनतेचा निर्णय : प्रदीप आदित्य जैन

Share

कर्नाटकातील भाजप सरकारच्या 40 टक्के भ्रष्टाचाराला जनता कंटाळली असून काँग्रेसला कौल देण्याचा निर्णय जनतेने घेतला आहे असे माजी केंद्रीय मंत्री प्रदीप आदित्य जैन यांनी सांगितले.

माजी केंद्रीय मंत्री प्रदीप आदित्य जैन यांनी आज बेळगाव जिल्हा काँग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, ज्या राज्यात 40% कमिशन घेतले जाते तेथे गावांचा विकास होऊ शकत नाही. भाजपने पक्षपात करून जैन समाजावर अन्याय केल्याचा आरोप त्यांनी केला. महात्मा गांधींच्या विचारधारेवर चालणारा काँग्रेस पक्ष जगाला अहिंसेचा संदेश देणाऱ्या जैन समाजाच्या विकासासाठी सदैव तत्पर आहे असे त्यांनी सांगितले.

काँग्रेस आदिवासी आणि जैन समाजाच्या सर्व परंपरांचा आदर करत आहे. त्यामुळे निवडणुकीच्या अनुषंगाने कर्नाटकातील जनता काँग्रेसला मत देऊन आशीर्वाद देईल, असे ते म्हणाले.
यावेळी काँग्रेस नेते व पदाधिकारी उपस्थित होते.

Tags: