राज्यभरात आज खुल्या प्रचाराचा, घरोघरी जाऊन प्रचाराचा अंतिम टप्पा आहे. त्यामुळे मी आमच्या पक्षाच्या उमेदवारांना आपापल्या मतदारसंघात जाऊन प्रचार करण्याच्या सूचना केल्या आहेत. आमचे उमेदवार मोठ्या फरकाने विजयी होतील, असा विश्वास मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी व्यक्त केला.
शहरात पत्रकारांशी बोलताना त्यांनी भाजप सरकारचा दीड लाख भ्रष्टाचाराचा पैसा शेतकऱ्यांना वाटणार, या काँग्रेसच्या वक्तव्याबाबत ते म्हणाले कि , इतका पैसा कुठून आणणार . यावर विश्वास बसत नाही, मला आश्चर्य वाटते, तुमच्याकडे कोणते पुरावे आहेत ते दाखवा, असे मी निवडणूक आयोगाला सांगितले आहे. त्यांना अद्याप वेतन मिळालेले नाही. त्यांच्याकडे एकाही प्रकरणात पुरावे नाहीत. एवढ्या चर्चेनंतर काँग्रेसवर गुन्हा दाखल झाला तर त्यांच्यावरही गुन्हा दाखल होईल आणि ते उत्तर देण्याऐवजी न्यायालयात चकरा मारतील, असेही ते म्हणाले.


Recent Comments