खानापूर तालुक्यातील मोठे गाव असलेल्या पारिशवाड गावात डॉ. अंजली निंबाळकर यांनी झंझावाती प्रचार केला. यावेळी गावकऱ्यांनी त्यांचे पुष्पवृष्टी उत्स्फूर्त स्वागत करून जयजयकाराच्या घोषणा दिल्याचे पाहायला मिळाले.
होय, आमदार डॉ.अंजली निंबाळकर यांनी गेल्या पाच वर्षात केलेली विकासकामे पाहून तिथे अंजलीपर्व तयार झाल्याचे दिसून आले.


यावेळी बोलताना आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी, येत्या 10 तारखेला आपले अमूल्य मत मला देऊन पुन्हा निवडून द्या अशी विनंती केली.
त्यानंतर लिंगायत समाजाचे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन वाली म्हणाले की, खानापूर ते पारिशवाड हा रस्ता आजपर्यंत एकही आमदार करू शकला नाही, असे काहीही केले नाही. कोरोनाच्या काळात दोन वर्षे रस्ता तसाच राहिला, मात्र आ. निंबाळकर यांनी विकासकामांवर भर दिला असून तालुक्याच्या सर्वांगीण विकासावर अधिक प्राधान्य दिले आहे.शाळा, महाविद्यालये बांधली आहेत. भाजपने काय केले, असा सवाल त्यांनी केला.
यावेळी महिला व युवकांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून आमदार डॉ.अंजली निंबाळकर यांना अभूतपूर्व पाठिंबा व्यक्त केला.


Recent Comments