Belagavi

निस्वार्थ वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉ. रवी पाटील यांना विजयी करण्याचा निर्धार

Share

कर्नाटक सार्वत्रिक निवडणुकीसाठी तीन दिवस शिल्लक असून प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. बेळगाव उत्तर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार डॉ.रवी पाटील यांनी गांधीनगर मतदारसंघात प्रचार केला. यावेळी निस्वार्थ वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉ. रवी पाटील यांना विजयी करण्याचा निर्धार लोकांनी केलाय.


गांधीनगर भागात आज सकाळपासून सुरू केलेल्या प्रचारात डॉ. रवी पाटील यांनी घरोघरी जाऊन मते मागितली. लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. डॉ.रवी पाटील यांनी वैद्यकीय सेवेत राहून समाजाची चांगली सेवा केली असल्याचेही स्थानिकांनी सांगितले. तसेच रवी पाटील यांनी आमची सेवा केली असून आम्ही त्यांना मत देऊ, असे नागरिकांनी सांगितले.

यावेळी बोलताना डॉ. रवी पाटील म्हणाले की, गेल्या वीस वर्षांपासून वैद्यकीय क्षेत्रात लोकांना अनेक सुविधा दिल्या जात असून यावेळी भाजपला मतदान करून अधिकाधिक सेवा करू द्यावी असे आवाहन मतदारांना केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कृती आराखड्यांतर्गत बेळगावचा विकास करण्यासाठी प्रयत्न करणार आहे असे त्यांनी सांगितले.

यावेळी 10 मे रोजी न चुकता भाजपला मतदान करण्याचे आवाहन त्यांनी मतदारांना केले. यावेळी बेळगावात कमळ फुलवून शहराच्या विकासाचा ठसा उमटवणार असल्याचे त्यांनी सांगितले. .

Tags: