election

मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधानांची बदनामी करणे चुकीचे

Share

काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे आपल्या समाजातील आहेत. मात्र, त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बदनामी करणे चुकीचे होते. पक्षाचा खासदार कोणीही असला, तरी पंतप्रधान आणि राष्ट्रपती या उच्च पदांवर असलेल्यांचा अनादर करू नये असे असे मत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले.


कागवाड मतदारसंघातील मंगसुळी गावात आयोजित भाजप उमेदवार श्रीमंत पाटील यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते.

पुढे बोलताना नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली भाजप हा देशातीलच नव्हे तर

जगातील सर्वात मोठा पक्ष आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानानुसार देशाचा विकास केला आहे. दलित समाजाचे सर्व दुःख आणि सुख ते ऐकत आहेत. केंद्रात माझा पक्ष सत्तेत असून मी एकमेव खासदार आहे, मात्र मला मंत्रिपद देण्यात आले आहे, असे ते म्हणाले.
केंद्रात आणि कर्नाटक राज्यात भाजप पक्षाचे डबल इंजिन सरकार आहे. त्यांनी येथे सुशासन दिले आहे. कागवाड मतदारसंघाचे आमदार श्रीमंत पाटील यांनी आपल्या कार्यकाळात 3000 कोटींचे अनुदान मंजूर करून विकास केला आहे. ते आपल्या दलित समाजाच्या बाजूने आहे. त्याला दलित समाजातील सदस्यांनी पाठिंबा दिला पाहिजे, असे ते म्हणाले.

कृष्णा नदीतून कर्नाटकला दरवर्षी चार टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय चांगला असून महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील शेतकऱ्यांना कर्नाटकातून पाणी सोडणे चांगले आहे. मला हे मान्य आहे. येत्या निवडणुकीत श्रीमंत पाटील यांचा विजय निश्चित आहे. निवडणुकीपूर्वी मी त्यांना शुभेच्छा देईन, असे ते म्हणाले.

आमदार श्रीमंत पाटील यांनी आपल्या राजकीय जीवनातील गोरगरिबांच्या समस्यांबाबत बोलताना सांगितले कि , सुमारे तीन हजार कोटी रुपयांच्या अनुदानातून , चांगले शिक्षण, पिण्याचे शुद्ध पाणी, रस्त्याचे दर्जेदार बांधकाम व इतर विकासकामे केली आहेत अशी प्रतिक्रिया दिली .
कृष्णा नदीवर महाराष्ट्रातील कोयना धरणातून दरवर्षी 4 टीएमसी पाणी सोडण्याचा करार केला जाईल, असे त्यांनी सांगितले.

अथणी पीएलडी बँकेचे अध्यक्ष अध्यक्षा शीतलगौडा पाटील, केएमएफचे संचालक आप्पासाहेब अवताडे , श्रीनिवास पाटील, अभय पाटील, सुधाकर भगत, शिवानंद पाटील, राकेश पाटील, आप्पासाहेब मलमलसी, सुभाष कुराडे, सुभाष ढमाले, विकी कांबळे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Tags: