Belagavi

शिवराजकुमार यांच्या रोड शोला चाहत्यांचा महासागर : लक्ष्मी हेब्बाळकर यांचा विजय निश्चित

Share

हॅटट्रिक हिरो शिवराजकुमार आणि त्यांची पत्नी गीता शिवराजकुमार यांनी शनिवारी सायंकाळी बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार लक्ष्मी हेब्बाळकर यांचा प्रचार केला.


सुरुवातीला सुळेभावीच्या महालक्ष्मी मंदिरात पूजा करून शिवराजकुमार यांनी तेथून शिंदोळी येथे पोहोचून रोड शो केला. रोड शो सुरू होण्यापूर्वी त्याने कन्नड चित्रपटातील लोकप्रिय गाणी गाऊन चाहत्यांच्या उत्साह वाढवला.

शिवराजकुमार यांचे सुळेभावी येथे आगमन होताच जमावाने शिवराजकुमार व लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या बाजूने जोरदार घोषणाबाजी केली. शिवराज कुमार यांचा विजय, काँग्रेस पक्षाचा विजय, एक दो तीन चार लक्ष्मीअक्कांचा जय जय कार अशा घोषणा दिल्या.

यावेळी बोलताना शिवराज कुमार म्हणाले, देवाच्या आणि तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने लक्ष्मी हेब्बाळकर यांचा विजय निश्चित आहे. त्यांनी या क्षेत्रात आधीच खूप विकास केला आहे. त्यांना निवडून दिल्यास मतदारसंघाचा अधिक विकास होईल. तुमचा आशीर्वाद त्यांच्यासाठी असाच राहो.
सुळेभावीतही त्यांनी कन्नड चित्रपटातील गाणी गायली. शिवराज कुमार यांना जवळून पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली होती.

यावेळी आमदार लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या की, चार दिवसांत निवडणूक होणार आहे. मला आशीर्वाद द्या आणि आपण सर्वांनी मिळून मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करूया.
यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी क्रांतीवीर संगोळ्ळी रायण्णा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर शिवराजकुमार यांनी होन्निहाळमध्येही प्रचंड गर्दीत रोड शो केला. लक्ष्मी हेब्बाळकर गतवेळच्या तुलनेत यावेळी मोठ्या मताधिक्याने विजयी होतील याची खात्री असल्याचे गर्दी पाहणारे लोक बोलत होते.
यावेळी विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, मृणाल हेब्बाळकर, शंकरगौडा पाटील, नागेश देसाई, गंगण्णा कल्लूर, बसवराज म्यागोटी, निलेश चंदगडकर, रजत उल्लागड्डीमठ आदी उपस्थित होते.

Tags: