Belagavi

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा बेळगावात भव्य रोड शो

Share

बेळगाव उत्तरमधील भाजप उमेदवार रवी पाटील यांच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भव्य रोड शो केला. फुलांचा वर्षाव करून बेळगावकरांनी शाह यांचे स्वागत केले.


प्रचाराला अवघा एकच दिवस शिल्लक असताना मोदींसह भाजपचे अनेक दिग्गज नेते राज्यात प्रवास करत आहेत. आज शनिवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बेळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतल्या.

सायंकाळी सात वाजता अमित शाह यांनी धर्मवीर संभाजी चौकापासून उत्तरचे भाजप उमेदवार डॉ. रवी पाटील यांच्यासोबत रोड शो केला. रोड शोच्या मार्गावर जनतेने, भाजप कार्यकर्त्यांनी अमित शाह यांचे जल्लोषात स्वागत केले.

किर्लोस्कर रोड, मारुती गल्ली, गणपत गल्ली, खडेबाजार भागात फिरून संयुक्त महाराष्ट्र चौकात या रोड शोची सांगता झाली. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी जय श्रीरामच्या घोषणा दिल्या. यावेळी खा. मंगल अंगडी, महानगर भाजप अध्यक्ष आ. अनिल बेनके आदी उपस्थित होते.

Tags: