जर कर्नाटकात भाजपची पुन्हा सत्ता आली तर स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी कर्नाटकाचा विकास करून कर्नाटकाला देशात प्रथम क्रमांकावर आणतील असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले.


चिक्कोडी-सदलगा मतदार संघातील भाजप उमेदवार रमेश कत्ती यांच्या प्रचारासाठी शाह यांनी आज भव्य जाहीरसभा घेतली. प्रारंभी बजरंग बली श्रीरामाचा जयघोष करून या भागातील देवतांना प्रणाम करतो असे सांगून अमित शाह यानिओ काँग्रेसवर टीका केली. मागील निवडणुकीत बेळगाव जिल्ह्यात भाजपला १८ पैकी ११ जागा जिंकून दिल्या होत्या. जर पूर्ण १८ जागा मिळाल्या असत्या तर कर्नाटकात पूर्ण बहुमताने आमची सत्ता आली असती.
त्यामुळे या निवडणुकीत स्वतः येऊन प्रचार करून मोदींच्या झोळीमध्ये सर्व १८ जागा घाला अशी विनंती करण्यासाठी मी आलो आहे असे ते म्हणाले. काँग्रेसने खोट्या गॅरंटी देण्याच्या घोषणा केल्या आहेत. राहुल गांधी स्वतः गुजरात-उत्तरप्रदेशमध्ये जाऊन खोट्या गॅरंटीच्या घोषणा दिल्या होत्या.
मात्र तेथे काँग्रेसचा संपूर्ण सफाया झाला. जर काँग्रेसची सत्ता आली तर त्यांच्या खोट्या गॅरंटीतुन शिक्षक आणि पोलिसांचा पगार ते देऊ शकतील का? असा सवाल शाह यांनी केला. भाजपने विकासात कसलाही भेदभाव केलेला नाही. मग तो म्हादई असो वा अन्य प्रकल्प. अप्पर कृष्णा, कळसा-भांडुरी, भद्रा योजनांसाठी करोडो रुपयांचे अनुदान मंजूर केले आहे. काँग्रेसला आतंकवाद्यांशी दोन हात करण्याची ताकद नाही.
देशाच्या विरोधात काम करणाऱ्या पीएफआयसारख्य संघटनांवर भाजप सरकारने एका रात्रीत बंदी घातली आहे. यासाठी संपूर्ण चिक्कोडीवासीयांना विनंती करून पुन्हा एकदा भाजप उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्या असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी खा. अण्णासाहेब जोल्ले, महांतेश कवटगीमठ, महांतेश दौडगौडर, प्रवक्ता एम. बी. जिरली, भाजप उमेदवार उपस्थित होते.


Recent Comments