मी नेहमीच मतदार संघातील समाजासोबत असतो. गेल्या निवडणुकीत तुम्ही पाठिंबा दिला आणि भरघोस मतांनी विजयी केलात . त्याचप्रमाणे यावेळीही अधिक मतांनी पाठिंबा द्या, असे स्थानिक आमदार व धर्मादाय , हज व वक्फ मंत्री शशिकला जोल्ले यांनी सांगितले.

निपाणी शहर , साखरवाडी, जत्राट वेस, जिजामाता चौक येथे कॉर्नर सभा घेऊन मतांचा प्रचार केला. त्या म्हणाल्या कि , , गेल्या 10 वर्षात मी निपाणी शहरामध्ये 450 कोटींची विकासकामे केली आहेत. शहरातील रस्ते, ड्रेनेज, घरोघरी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, अंगणवाडी, मंदिर देखभाल, सांस्कृतिक भवन, पर्यटक मंदिर, पोलिस स्टेशन, पोलिस वसतिगृह, 2052 मॉडेल G+2 प्रकल्पांतर्गत व्यावसायिक कर विभागाची इमारत, . 5.60 कोटीरुपये खर्चून बस स्थानक आणि बाल रुग्णालयाचे 8 कोटी रुपयांचे बांधकाम करण्यासहीत मी अनेक विकास कामे केली आहेत. तुम्ही मला नेहमीच क्षेत्रात विकासकामे करण्याची संधी दिली आहे. या क्षेत्राच्या पुढील विकासासाठी आणखी एक संधी देण्याची विनंती त्यांनी केली.
मतदारसंघातील भाजप नेते आणि शेकडो महिलांनी निवडणूक प्रचारात भाजप उमेदवार शशिकला जोल्ले यांना पाठिंबा दिला.
दरम्यान फुले शाहू आंबेडकर सामाजिक-सांस्कृतिक संघाचे अमित कांबळे, विक्की कांबळे, सूरज कांबळे, शिवराज कांबळे, चेतन शिंदे, रोहित मद्दे, अक्षय गस्ते, मनोज सावंत, रमेश वलके, अदीप कांबळे, नितीन कांबळे, उत्तम वलके, विनोद सेटण्णावर, सागर जाधव, सागर कांबळे, कृष्णा कांबळे आदी उपस्थित होते. मिलन कांबळे, स्वाती कांबळे, मनीषा भोसले, बबिता वलके यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केला, मंत्री शशिकला जोल्ले यांनी त्यांचे भाजप पक्षात स्वागत केले.
यावेळी कोल्हापूर जिल्हा भाजप अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, चंद्रकांत कोठीवाले नगर परिषद अध्यक्ष जयवंत भाटले भाजप शहराध्यक्ष प्रणव मानवी, प्रभावती सूर्यवंशी, महेश सूर्यवंशी, विनायक सुळकुडे, अविनाश माने, दीपक माने, संदीप माने, संतोष ठिगडे, सदस्य, स्थानिक नेते, कार्यकर्ते व मतदार उपस्थित होते.


Recent Comments