Belagavi

राज्यात पुन्हा येणार भाजपची सत्ता : प्रभाकर कोरे

Share

राज्यात पुन्हा भाजपची सत्ता येईल असा विश्वास केएलईचे कार्याध्यक्ष आणि माजी राज्यसभा सदस्य डॉ. प्रभाकर कोरे यांनी विश्वास व्यक्त केला आहे.

चिक्कोडी तालुक्यातील अंकली गावात पत्रकार परिषदेत बोलताना डॉ. कोरे म्हणाले की, राज्यात बोम्मईचे सरकार आणि केंद्रात मोदींचे सरकार असल्याने राज्यात मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली असून डबल इंजिन सरकारमुळे राज्याने विकासाचा नवा टप्पा गाठला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकाभिमुख विकास कार्यासोबतच राज्यातील भाजप सरकारने गेल्या 3 वर्षात बरीच विकासकामे केली आहेत. राज्यातील सुजाण मतदार भाजपला स्पष्ट बहुमत देतील आणि भाजप पक्ष विक्रमी मतांनी सत्तेत परतेल, असे ते म्हणाले. बाइट
यावेळी अंकली ग्रामपंचायत सदस्य तुकाराम पाटील, सुरेश पाटील आदी उपस्थित होते.

Tags: