विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यसभा सदस्य खा. धनंजय महाडिक, बसवज्योती युथ फाऊंडेशनचे अध्यक्ष बसवप्रसाद जोल्ले, राहुल आवाडे यांनी मतदारसंघातील कुन्नूर, सौंदलगा, कोगनोळी या गावांमध्ये प्रचार सभा घेऊन भाजपच्या उमेदवार शशिकला जोल्ले यांना जास्तीत जास्त मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले.


निपाणी मतदारसंघात अधिक विकास होण्यासाठी भाजपला साथ द्या. सुमारे दोन हजार कोटी रुपयांची विकासकामे करणे ही सोपी बाब नाही. भाजप सरकार नेहमीच विकासाच्या बाजूने विचार करते. लोक विकासवादी राजकारणाला पसंती देत आहेत. मतदारसंघाच्या अधिक विकासासाठी भाजप उमेदवार शशिकला जोल्ले यांना पाठिंबा देऊन आणि आशीर्वाद देण्याचे आवाहन खा. धनंजय महाडिक यांनी केले.
निपाणी शहरात येत्या काही दिवसांत जलतरण तलाव, मिनी विधानसौध आदी 450 कोटींची अतिरिक्त कामे करण्यात येणार आहेत. त्यासाठी या निवडणुकीत शशिकला जोल्ले यांना आपले बहुमोल मत देण्याचे आवाहन बसवप्रसाद जोल्ले यांनी केले.
यावेळी संजय शिंत्रे, गणपती गाडीवड्डर, एस. एस. ढवणे, आनंद सूर्यवंशी, दादू कोगनोळे, विक्रम पाटील, दिलीपा अडसुळे, सागर पवार, संजय दिंडे, संजय पाटील, दत्तात्रेय चौगले, रेखा पवार, अर्चना कोगनोळे, वैशाली मेस्त्री, कार्यकर्ते, स्थानिक नेते, बुथ अध्यक्ष, ग्रामस्थ उपस्थित होते.


Recent Comments