भाजपच्या उमेदवार, सचिव शशिकला जोल्ले म्हणाल्या की, काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात बजरंग दलावर बंदी घालण्याचे पाऊल निषेधार्ह आहे.

बेळगाव जिल्ह्यातील निप्पाणी शहरात प्रसारमाध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या कि , काँग्रेस पक्षाने आपल्या जाहीरनाम्यात बजरंग दलावर बंदी घातली असून निवडणुकीत जनता त्यांना धडा शिकवणार आहे.भारत हा स्वतःची संस्कृती, परंपरा आणि अध्यात्म असलेला देश आहे.बजरंग दल संघटना हिंदू धर्म वाचवण्यासाठी काम करत आहे. बजरंग दलावरील बंदीचा निषेध करत आज निपाणी शहर व गावागावात हनुमान चालीसा पठण करून बजरंग दलावर बंदी घालणाऱ्या काँग्रेसच्या कृतीचा निषेध करत आहोत.
यावेळी निपाणी नगरपरिषदेच्या अध्यक्ष जयवंत भाटले , बसवप्रसाद जोल्ले आदी उपस्थित होते.


Recent Comments