राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्ष या दोघांची मानसिकता महिला विरोधी आहे. त्यामुळेच मोदी सरकार सत्तेत येताच देशात महिलांवरील अत्याचारात वाढ झाल्याचा आरोप महाराष्ट्र काँग्रेसच्या कार्याध्यक्ष आणि प्रवक्त्या सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी केला. यावेळेस कर्नाटकातील जनता भाजपचे 40% कमिशनचे सरकार उलथून टाकेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

काँग्रेस प्रवक्त्यांसोबत बेळगावातील काँग्रेस भवनात पत्रकार परिषदेत बोलताना आ. प्रणिती शिंदे म्हणाल्या की, देशाला जगात सन्मान मिळवून देणाऱ्या महिला कुस्तीपटू न्यायासाठी दिल्लीत जंतर-मंतरवर उपोषण करत असताना मोदी सरकार, क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी त्यांची साधी भेट घेतली नाही. त्यांच्यावर अत्याचार करणारे कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण हे भाजपचे खासदार असल्याने त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न भाजप करत असल्याचा आरोप त्यांनी केला. काँग्रेसने महिलांची नेहमी काळजी घेतली आहे. कर्नाटकातील महिलांनी यावेळी भाजपला अव्हेरून महिलांसाठी पाच गॅरंटी दिलेल्या काँग्रेसला विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी काँग्रेस प्रवक्ता रोहन गुप्ता आणि अलोक शर्मा यांनीही पत्रकार परिषदेला संबोधित केले.
यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष विनय नावलगट्टी व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.


Recent Comments