
केपीसीसी कार्याध्यक्ष व यमकनमर्डी विधानसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सतीश जारकीहोळी यांनी जोरदार प्रचार सुरु केला आहे. बेनकमनहोळी आणि मनगुत्ती गावात बुथ लेव्हल कार्यकर्त्यांच्या बैठकीला उपस्थिती राहून त्यांनी यमकनमर्डी व कर्नाटकात काँग्रेसला निवडून देण्याचे आवाहन केले.

यावेळी बोलताना सतीश जारकीहोळी म्हणाले की, मतदारसंघात गेल्या 15 वर्षात अनेक विकासकामे केली आहेत. ती लक्षात घेऊन चौथ्यांदा काँग्रेस पक्षाला साथ देण्याचे आवाहन त्यांनी मतदारांना केले. जनतेच्या कल्याणासाठी, पूरक कायदे बनविण्यासाठी आणि राज्याला विकसित करण्यासाठी राज्यात काँग्रेसचे सरकार येणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येक मतदारसंघात काँग्रेसचा विजय कसा होईल हे पाहणे आवश्यक आहे. यासाठी यमकनमर्डी मतदारसंघातही मला आशीर्वाद देऊन काँग्रेसला साथ द्या असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी काँग्रेस पक्षाचे नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.



Recent Comments