Belagavi

राजकीय पक्षांचा विकास पाहिला, आता अपक्षाला संधी द्या : अशोक गोवेकर

Share

काँग्रेस, भारतीय जनता पक्षांसह सर्वच राजकीय पक्षांनी विकासाच्या नावाखाली जनतेची फसवणूक केली आहे. राजकीय पक्षांचा विकास तुम्ही पाहिला आहे, आता अपक्षाला संधी द्या असे आवाहन बेळगाव उत्तर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार अशोक गोवेकर यांनी केले.


प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते अशोक गोवेकर यावेळी बेळगाव उत्तर मतदारसंघात अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवीत आहेत. प्रारंभापासून समाजसेवेची आवड, तळमळ असलेल्या अशोक गोवेकर यांनी गेली कित्येक वर्षे निस्पृह आणि निस्वार्थ भावनेने समाजकार्य केले आहे. आमदार म्हणून निवडून आल्यास समाजकार्याची व्याप्ती वाढविता येईल या हेतूने ते यंदा बेळगाव उत्तर मतदारसंघातून अपक्ष म्हणून नशीब अजमावत आहेत.

आपले अनेक कार्यकर्ते, समर्थकांसह अशोक गोवेकर यांनी मतदारसंघात ठिकठिकाणी वेगवान प्रचार मोहीम राबवत आहेत. मतदारसंघातील बसवण कुडची गावात त्यांनी भेट देऊन मतयाचना केली. यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांचे भव्य स्वागत करून समर्थन व्यक्त केले. फटाके फोडून रहिवाशांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांना भगवा फेटा बांधून पुष्पहार घालून सत्कार केला आणि विजयासाठी शुभेच्छा दिल्या.

फ्लो
यावेळी बोलताना अशोक गोवेकर म्हणाले की, तुम्ही काँग्रेस, भाजपसारख्या राजकीय पक्षांचा अनुभव घेतला आहे. त्यांनी काय विकास केला तो पाहिला आहे. या दोन्ही पक्षांनी लोकांच्या अपेक्षा पूर्ण केलेल्या नाहीत. त्यामुळे बेळगाव उत्तर मतदार संघ विकासाच्या बाबतीत मागास राहिला आहे. रस्ते, गटारी, उद्याने, पाणी, वीज अशा सर्व मूलभूत सुविधा पुरवून मतदारसंघाचा विकास करण्याचे माझे स्वप्न आहे. याशिवाय ज्या काही समस्या असतील त्या सोडविण्यासाठी, जनतेच्या अडचणीवेळी मदतीसाठी मी सदैव तत्पर राहीन. त्यामुळे येत्या निवडणुकीत मला प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन अशोक गोवेकर यांनी केले.

यावेळी धनंजय मुचंडीकर, अभिषेक बोगार, कुशल मुतकेकर, विठ्ठल मुतकेकर, परशुराम पाटणेकर यांच्यासह बसवण कुडचीतील स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: