Belagavi

उत्तरमध्ये राजू टोपन्नावर यांना अभूतपूर्व पाठिंबा

Share

बेळगाव उत्तर मतदारसंघातील आम आदमी पक्षाचे उमेदवार राजकुमार टोपन्नावर यांनी महांतेश नगर आणि इन्कम टॅक्स कॉलनीमध्ये घरोघरी जाऊन प्रचार केला. निवडून आल्यावर जनतेला सर्व मूलभूत सुविधा पुरवून बेळगाव शहराचा सर्वांगीण विकास करण्याचा शब्द त्यांनी मतदारांना दिला.


राजकुमार टोपन्नावर यांच्या प्रचारमोहिमेला सर्वत्र लोकांचा अभूतपूर्व पाठिंबा मिळत आहे. बेळगाव उत्तर मतदारसंघात दोन्ही राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांना संधी दिली आहे. पण यावेळी आम आदमी पक्षाला आशीर्वाद देऊ अशी भावना लोक व्यक्त करत आहेत हे विशेष.
राजकुमार टोपन्नावर हे दूरदृष्टीचे नेते आहेत. यावेळी बेळगाव उत्तर मतदारसंघातून निवडून आल्यास मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करू, असे आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष शंकर हेगडे यांनी सांगितले.

यावेळी जुनैद पाशा, एम. के. सय्यद, शिवानंद कारी आदींसह अनेकांची या वेळी उपस्थिती होती.

Tags: