Belagavi

जेडीएसचे उमेदवार शिवानंद मुगळीहाळ याना मतदारसंघात उत्स्फूर्त पाठिंबा

Share

बेळगाव उत्तर मतदार संघाचे जेडीएसचे उमेदवार शिवानंद मुगळीहाळ याना मतदारसंघात जनतेकडून भरघोस पाठिंबा लाभत आहे . प्रचारादरम्यान त्यांनी बाजारपेठेतील रस्त्यांवरील किरकोळ विक्रेते तसेच कणबर्गी भागात मतदारांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला आणि जेडीएस सत्तेत येताच तुमच्या सर्व समस्या सोडवू अशी ग्वाही दिली . यासाठी जेडीएस ला मतदान करण्याचे आवाहन केले .
जेडीएस नेते शिवानंद मुगळीहाळ यांनी मतदारसंघातील रस्त्यांवरील विक्रेत्यांची भेट घेऊन त्यांना जेडीएसला मतदान करण्याचे आवाहन केले . यावेळी ह्या रस्त्यांवरील विक्रेत्यांनी शिवानंद मुगळीहाळ याना पुष्पहार घालून त्यांचे स्वागत केले .


यावेळी एका विक्रेत्याने सांगितले कि , कुमारस्वामी मुख्यमंत्री असताना , आम्हा रस्त्यावरील विक्रेत्यांसाठी दहा हजार रुपयांचे साह्य धन दिले होते . मात्र आताच्या सरकारने आमच्याकडे दुर्लक्ष केले आहे . यावेळी कुमारस्वामींचे सरकार पुन्हा सत्तेत यावे अशी इच्छा त्याने व्यक्त केली .

यावेळी बोलताना शिवानंद मुगळीहाळ यांनी , सत्काराबद्दल विक्रेत्यांना धन्यवाद दिले तसेच , त्यांच्या ज्या काही समस्या असतील , मूलभूत सुविधा हव्या असतील तर , त्या मागण्या निवडून आल्यावर पूर्ण करू असे आश्वासन दिले .

त्याचप्रमाणे कणबर्गी भागाला भेट देऊन तिथल्या मतदारांशी संवाद साधला . यावेळी उपस्थितांनाही जेडीएस तसेच कुमारस्वामींचा जयजयकार केला . शिवानंद मुगळीहाळ यांनी यावेळी , कणबर्गी येथील सिद्धेश्वर मंदिराचा परिसर पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याचे तसेच कणबर्गी गावात रस्ते, गटारी , पिण्याचे पाणी तसेच पथदीपांची सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले . त्याचप्रमाणे , कुमारस्वामी यांचे सरकार स्थापन करण्यासाठी जेडीएसला मतदान करण्याचे आवाहन केले .

एकंदर , जेडीएस चे उमेदवार शिवानंद मुगळीहाळ याना मतदार संघातील जनतेचा भरघोस पाठिंबा लाभत आहे .

Tags: