Belagavi

प्रभावती मास्तमर्डी यांचा कल्याणनगर भागात प्रचार

Share

बेळगाव दक्षिणमधील काँग्रेस उमेदवार प्रभावती मास्तमर्डी यांनी वडगाव परिसरातील कल्याणनगर भागात झंझावाती प्रचार केला.

यावेळी मतदारांशी संवाद साधताना प्रभावती मास्तमर्डी म्हणाल्या की, स्थानिक नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित असून भाजप सरकारला जनता कंटाळली आहे. कल्याण नगरमधील रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे, रस्ते पूर्णपणे चिखलाने माखले आहेत. घरांमध्ये धूळ साचली आहे. तसेच लोकांना ये-जा करणेही अवघड झाले आहे.

ड्रेनेजचे कामही अर्ध्यावरच बंद पडले असून, स्वच्छता न झाल्याने नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. घरगुती वस्तूंच्या किमतीत वाढ झाल्याने गरीब लोकांना जगणे अवघड झाले आहे. त्यामुळे काँग्रेसच्या निवडणूक जाहीरनाम्यात 5 हमी देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी मतदारांनी निवडणुकीत एकमताने काँग्रेसला पाठिंबा देत बेळगाव दक्षिण मतदारसंघात परिवर्तन घडवून आणण्याचे आश्वासन दिले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने प्रचारात सहभाग घेतला.

Tags: