election

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची आ . श्रीमंत पाटील यांच्यासाठी भव्य प्रचार सभा

Share

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची आ . श्रीमंत पाटील यांच्यासाठी भव्य प्रचार सभा

भारतातील शेतकरी हे अन्नदाता आहेत आणि भविष्यातही ते ऊर्जा पुरवठादार असतील. शेतकऱ्यांनी पिकवलेल्या उसापासून साखरेसोबत इथेनॉल तयार केले जाते. देशात पेट्रोल आणि डिझेल आयात करण्यासाठी 16 हजार कोटी रुपये खर्च केले जातात. यामध्ये 40 हजार कोटी रुपये 20% इथेनॉल वापरण्यात आले. देशात बचत होत आहे. त्यामुळे शेतकरी हा अन्नदात्याबरोबरच ऊर्जादाताही आहे, असे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नीतिन गडकरी यांनी उगार येथे सांगितले.

भाजपचे उमेदवार श्रीमंत पाटील यांच्यासाठी प्रचार करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी बुधवारी संध्याकाळी उगारखुर्द येथे आले होते .

भारताला महासत्ता बनवण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ध्येय आहे. कर्नाटक राज्यात आणि केंद्रात भाजपचे सरकार असल्याने दुहेरी इंजिनचे सरकार खूप विकसित झाले आहे. कागवाड मतदारसंघाचे उमेदवार व आमदार श्रीमंत पाटील हे बी.एस्सी पदवीधर असून शेतकऱ्याचा मुलगा असल्याचे सांगत ते म्हणाले कि , भाजप पक्षाला मतदान करून पूर्ण ताकदीनिशी त्यांना निवडून आणा असे आवाहन केले . त्याना सर्व घडामोडींची संपूर्ण माहिती असते. आधीच तीन हजार कोटी अनुदान आणून त्यांनी या क्षेत्राचा विकास केला आहे. बसवेश्वर सिंचन प्रकल्प कार्यान्वित झाल्यास लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. अशा लोकप्रिय आमदारांची निवड करून मतदारसंघाचा विकास केला जाईल, असा संदेश मंत्र्यांनी दिला.

मंत्री नितीन गडकरी यांनी सुरुवातीला कन्नडमध्ये भाषण करून लोकांना प्रभावित केले. त्यासोबतच त्यांनी देशातील रस्ते वाहतुकीच्या विकासाची माहिती हिंदी व मराठी भाषेत सांगून अथणी, मुरगुंडी, कागवाड, चिक्कोडी या मंजूर राज्य महामार्गाची माहिती दिली.
आमदार श्रीमंत पाटील म्हणाले, मी माझ्या राजकीय जीवनात जातीचे राजकारण केलेले नाही. सर्वांना एकत्र करून मी विकास साधत आहे. मतदार संघातील लोक हे एका कुटुंबासारखे असतात. मी माझ्या मुलांवर प्रेम करत असल्याने मी माझ्या मतदारांना देव मानतो. या क्षेत्राच्या विकासासाठी आतापर्यंत ३ हजार कोटी रुपये अनुदान मी आणले आहे. याकडे लक्ष वेधून मतदार काहीही झाले तरी आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत, अशी ग्वाही देत आहेत. यामुळे माझे यश निश्चित असल्याचे श्रीमंत पाटील यांनी सांगितले.

 

शीतल गौडा पाटील, वकील अभयकुमार अकिवाटे, शिवानंद पाटील, नंदिनी फरकट्टे आदी भाजपचे दिग्गज कार्यक्रमात बोलत होते आणि म्हणाले की, कागवाड मतदारसंघातील आमदार हे आमच्या क्षेत्राला मिळालेले दुर्मिळ आमदार आहेत. सर्वांनी त्यांच्या बाजूने उभे राहून आमच्या मतदारसंघाच्या विकासासाठी त्यांना पुन्हा एकदा निवडून आणण्याची शपथ घेतली.

कार्यक्रमात महाराष्ट्राचे माजी मंत्री जयकुमार रावत, आमदारांच्या पत्नी उज्वलाताई पाटील शीतल पाटील, दुंडाप्पा बेंडवाडे , निंगाप्पा खोकळे, उत्तम पाटील, सुशांत पाटील, अप्पासाहेब अवताडे यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून शक्तिप्रदर्शन केले .

Tags: