election

आ . डॉ . अंजली निंबाळकर यांचा मतदारसंघातील गावांमध्ये जोरदार प्रचार

Share

आमदार डॉ.अंजली निंबाळकर यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह सगरे, दोड्डेबैल , हाळे झुंजवाड गावात रोड शो केला. या गावातून त्यांना भरघोस पाठिंबा मिळाला .


खानापूर तालुक्यातील सगरे, दोड्डेबैल, हाळे झुंजवाड या गावांमध्ये आ . डॉ . अंजली निंबाळकर यांनी शेकडो कार्यकर्त्यांसमवेत रस्ता व कॉर्नर बैठका घेतल्या.

यावेळी त्यांनी आपल्या सेवेच्या काळात शेतकरी व सर्वसामान्यांच्या हितासाठी अनेक विकास प्रकल्प राबविले आहेत. त्याचप्रमाणे खानापूरच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देऊन , निधी मंजूर करून घेऊन , विकास कामे केली आहेत . यावेळी एका लहान मुलीने , आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. आ . निंबाळकर यांनी त्या मुलीशी छान संवाद साधला .

यावेळी या गावातील महिला , जेष्ठ नागरिक आणि युवा मतदारांनी आ . अंजली निंबाळकर याना पाठिंबा दर्शवून त्यांना निवडून आणण्याची ग्वाही दिली .

Tags: