Belagavi

राजू सेठ यांच्यासाठी जगदीश शेट्टर उद्या बेळगावात करणार प्रचार

Share

बेळगाव उत्तर मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार राजू सेठ प्रचारासाठी माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर उद्या बेळगावात येत आहेत.

उद्या सायंकाळी ५.३० वा महांतेश नगरमध्ये जगदीश शेट्टर राजू सेठ यांच्यासाठी प्रचार मोहीम राबवणार आहेत. शेट्टर कर्नाटकातील बहुसंख्य लिंगायत समाजाचे मोठे नेते आहेत.

नुकताच त्यांनी भाजपचा त्याग करून काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. आता काँग्रेसने त्यांना राजू सेठ यांच्या प्रचारात उतरवले आहे. उद्या ते जाहीर सभा घेणार आहेत. महांतेश नगर, अंजनेय नगर,

श्रीनगर, रामतीर्थ नगर या लिंगायत समाजाची लोकसंख्या अधिक असलेल्या भागात ते प्रचारमोहीम राबवणार आहेत. त्यामुळे काँग्रेसला याचा फायदा होण्याची शक्यता आहे.

Tags: