election

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना एकच मताचा अधिकार दिला आहे त्यामुळे लोकशाहीत मतदान प्रक्रियेला महत्त्व आहे.

Share

शशिकला जोल्ले यांनी निपाणी मतदारसंघात 350 मंदिरांचा जीर्णोद्धार करण्याचे काम केले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची प्रेरणा त्यांनी घेतली आहे.

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घराणेशाही व डाकू गिरी आहे त्यामुळे त्यांच्या विरोधात मतदान करून 10 मे रोजी शशिकला जोल्ले यांना निवडून द्या असे आवाहन आ. गोपीचंद पडळकर यांनी केले.

ते भाजप प्रचारार्थ आप्पाचीवाडी येथे आयोजित धनगर समाज बांधवांच्या सभेत बोलत होते. स्वागत सिद्धू नराटे यांनी तर प्रास्ताविक डॉ. अजित गोपछाडे यांनी केले. आ. पडळकर म्हणाले, हलचितनाथाच्या भाकणुकीप्रमाणे देशावर भगवा फडकला असून संन्याशी चारित्र्यसंपन्न व्यक्ती पंतप्रधानपदी बसली आहे.

नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या प्रांगणात तसेच काशी विश्वनाथ कॉरिडॉर मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा उभारला आहे. काँग्रेसने नेहमीच धनगर समाजाचा अपमान केला परंतु भाजपने धनगर समाजाचा सन्मान केला आहे. नंदगड येथे संगोळी रायण्णा यांचे यतूची स्मारक उभारण्यासाठी जोडले यांनी प्रयत्न करावा असे सांगितले सर्व समाजाला बरोबर घेऊन जाणारे मोदी यांचे नेतृत्व असल्याने भाजप सत्तेवर येणे गरजेचे आहे. राष्ट्रवादी पक्षाचा राष्ट्रीय दर्जा संपला आहे जोल्ले यांनी महिला वर्गासाठी आदर्शदायी काम केले आहे धनगर समाजाने संघटित होऊन भाजपच्या पाठीशी राहावे अंधश्रद्धा बाजूला ठेवून शिक्षणाकडे लक्ष द्यावे विकासाच्या दृष्टिकोनातून राजकारण झाले पाहिजे त्यामुळे शशिकला जोल्ले यांनी केलेली विकास कामे पाहून येणाऱ्या निवडणुकीत कमळ चिन्हावर भरघोस मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले.


मंत्री शशिकला जोल्ले म्हणाल्या, निपाणीच्या पहिल्या महिला आमदार व मंत्री म्हणून आपण शासनाच्या विविध योजना मतदारसंघात राबवल्या आहेत कोरोना काळात 700 रुग्णांवर मोफत उपचार करून त्यांची जीव वाचवण्याचे काम केले आहे. हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याला उर्जित अवस्था प्राप्त करून दिली आहे. जोल्ले ग्रुपच्या माध्यमातून 2 हजार युवकांना रोजगार दिला आहे बचत गटाच्या माध्यमातून 150 महिलांच्या हातांना काम दिले आहे त्यामुळे या निवडणुकीत भाजपला बहुमताने निवडून देऊन विरोधकांना निकाल दाखवून द्या. हुलजंती येथील महालिंगराया मंदिराजवळ तसेच पट्टणकोडोली येथील विठ्ठल बिरदेव मंदिर परिसरात कर्नाटक यात्री निवास बांधून देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. भाजपाने जाहीरनाम्यात तीन सिलेंडर मोफत देण्याची घोषणा केली असून घरे नसणाऱ्यांना घरी बांधून दिली जाणार आहेत काँग्रेसने बजरंग दलावर बंदी आणण्याची भाषा केली आहे भारत हे हिंदुराष्ट्र असल्याने काँग्रेसला या निवडणुकीत पराभूत करा असे सांगितले.

खा. धनंजय महाडिक म्हणाले, विरोधक अपप्रचार करीत आहेत जातीसाठी मत मागितले जात आहे. मात्र मराठा समाज हा कोणाचीही मक्तेदारी नाही गावा गावात विकासाची गंगा आणलेल्या शशिकला जोल्ले यांना पुन्हा निवडून देऊन सर्वांगीण विकासाला चालना देण्याचे आवाहन केले. नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचाराची कीड संपवण्याचा विडा उचलला आहे कोट्यावधींचे घोटाळे देशाने पाहिले आता मात्र कोणतीही योजना शेतकऱ्यांच्या तसेच सर्वसामान्य व्यक्तींच्या जनधन खात्यावर अनुदान रुपी जमा होत आहे. विकास कामांबरोबर क्रीडा स्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून जोल्ले यांनी मतदारसंघाचा सर्वसमावेशक विकास केला आहे. त्यांना निवडून देऊन सर्वांगीण विकास करण्याची संधी देण्याचे आवाहन केले. व्यासपीठावर खा. अण्णासाहेब जोल्ले, हाल शुगरचे उपाध्यक्ष एम पी पाटील, अभय मानवी, पवन पाटील, म्हाळाप्पा पिसुत्रे, एस एस ढवणे, महादेव बरगाले, एस के खजानावर, श्रीकांत बन्ने यांच्यासह धनगर समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: