Belagavi

प्रभावती मास्तमर्डी यांचा वडगावमध्ये झंझावाती प्रचार

Share

बेळगाव दक्षिणमधील काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार प्रभावती मास्तमर्डी यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली आहे. मतदारसंघातील वडगाव परिसरात त्यांनी कार्यकर्त्यांसमवेत झंझावती प्रचार केला.

वडगावमधील बाजार गल्ली, तेग्गीन गल्ली, कल्याण नगर आदी भागात प्रभावती मास्तमर्डी यांनी घरोघरी जाऊन प्रचार केला, ज्येष्ठ, तरुण, महिला यांची भेट घेऊन सर्वांना काँग्रेस पक्षाला मतदान करण्याची विनंती केली. त्या जिथे गेल्या तिथे लोकांनी त्यांचे नम्रतेने स्वागत केले, यावेळी मतदारांनी या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मतदान करून बेळगाव दक्षिण मतदारसंघातून पहिल्यांदाच महिला आमदार निवडून आणून त्यांना विधानसौधमध्ये पाठवणार असल्याचे सांगितले. हे सर्वजण परिवर्तनासाठी उत्सुक असून यावेळी काँग्रेसचा विजय त्यांच्या भावनांमधून दिसून येत आहे.

प्रभावती मास्तमर्डी यांनी यावेळी मतदारांना काँग्रेसच्या 5 लोकाभिमुख हमीची माहिती दिली. गॅरंटी कार्डमध्ये जाहीर केलेल्या योजनांचा लाभ घेण्यासाठी काँग्रेस पक्षाला भरघोस मतांनी विजयी करून सत्तेत आणण्याची विनंती त्यांनी मतदारांना केली. यावेळी त्यांनी वडगाव परिसरातील रस्त्यावरील विक्रेते आणि दुकानदारांना काँग्रेसला पाठिंबा देण्याचे आवाहन केले.

Tags: