काँग्रेसने बेळगाव शहरासाठी सर्वोत्तम उमेदवार निवडला आहे आणि भविष्यात होणार्या सर्व विकासासाठी शहर पात्र आहे. त्यासाठी राजू सेठ यांना प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.

बेळगाव उत्तर मतदार संघातील काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आसिफ उर्फ राजू सेठ यांच्या प्रचारासाठी आसद खान सोसायटी परिसरात काँग्रेसची कोपरा प्रचारसभा घेण्यात आली. त्यावेळी बोलताना महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी, बेळगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी राजू सेठ यांना भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन केले.
यावेळी बोलताना बेळगाव उत्तरचे माजी आमदार फिरोज सेठ म्हणाले की, माझ्या भावाला आणि बेळगावच्या लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी मी सदैव उपलब्ध आहे. मला आयुष्यभर बेळगावच्या लोकांची सेवा करायची आहे आणि तुम्ही मला दिलेले प्रेम परत द्यायचे आहे.
यावेळी उमेदवार आसिफ उर्फ राजू सेठ म्हणाले, बेळगावच्या लोकांकडून मिळालेला पाठिंबा खूप मोठा आहे, आणि तुमच्या सर्वांकडून मला नेहमीच मिळालेल्या प्रेमामुळे मी एक मजबूत व्यक्ती बनलो आहे. बेळगाव शहराची सेवा करण्याची प्रेरणा याला माझे सर्वोच्च प्राधान्य आहे. त्यामुळे तुमची सेवा करण्यासाठी मला निवडून द्या असे आवाहन केले.
यावेळी व्यासपीठावर आमदार जब्बार खान, काँग्रेस ग्रामीण जिल्हाध्यक्ष विनय नावलगट्टी, स्थानिक नगरसेवक आदी उपस्थित होते. सभेत राजू सेठ यांना प्रचंड मतांनी निवडून देण्याचा निर्धार करण्यात आला.


Recent Comments