Belagavi

बेळगावच्या मध्यवर्ती भागात डॉ. रवी पाटील यांचा प्रचार

Share

बेळगाव उत्तर मतदारसंघातील भाजपचे अधिकृत उमेदवार डॉ. रवी पाटील यांनी शहराच्या मध्यवर्ती भागात झंझावाती प्रचार केला. स्थानिक नगरसेवकांसह भाजप कार्यकर्ते, समर्थक यांची जल्लोषी साथ त्यांना यावेळी लाभली.
कमळ फुल पॉवरफुल ! अशा जोशात सुरू झालेल्या या प्रचार मोहिमेला आज सकाळी आठ वाजल्यापासून सुरुवात झाली. शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी भाजपने प्रचार केला. टिळक चौक, कोनवाळ गल्ली, रामलिंग खिंड गल्ली, अनसुरकर गल्ली, रामदेव गल्ली, किर्लोस्कर रोड, केळकर भाग आदी भागात जोरदार प्रचार करण्यात आला.


प्रचारात भाग घेत, पार्वती मुलीमनी, यांनी ७० व्या वर्षीही उत्साहाने “कमळ फुल पॉवरफुल !” अशा जोशपूर्ण घोषणा दिल्या. आम्ही पूर्वीपासूनच भाजपला मतदान करत आहोत, तेव्हापासून आम्ही भाजप सोडून इतर कोणत्याही पक्षाला मतदान केले नाही असे त्यांनी सांगितले.

डॉ. रवी पाटील यांच्याबद्दल बोलताना, “जनसेवा हीच जनतेची सेवा’ असे मानणारे डॉ. रवी पाटील यावेळी 100 टक्के विजयी होतील, असा मला विश्वास आहे. डॉ. रवी पाटील यांचे चारित्र्य, वागणूक आणि सेवाभावना कौतुकास्पद आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण यावेळी भाजपचाच विजय होणार असल्याचे सांगत आहेत असे त्यांनी सांगितले.


प्रभाग क्रमांक ४ चे नगरसेवक जयतीर्थ सौंदत्ती यांनी सांगितले की, टिळक चौक, कोनवाळ गल्ली, रामलिंग खिंड गल्ली, अनसुरकर गल्ली, रामदेव गल्ली, किर्लोस्कर रोड, केळकर भाग आदी भागात आम्ही दुसऱ्यांदा प्रचार करत आहोत. लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रचारात लोकांनी उत्साहात सहभाग घेतला.
प्रभाग क्र. ६ चे नगरसेवक संतोष पेडणेकर म्हणाले की, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर या भागातील मराठी लोक भाजपच्या पाठीशी आहेत. लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, कार्यकर्त्यांना सोबत घेऊन जाणाऱ्या चांगल्या व्यक्तिमत्वाच्या डॉ. रवी पाटील यांना भाजपने उमेदवारी दिल्याने त्यांचा विजय निश्चित आहे असे त्यांनी सांगितले.
यावेळी अनेक भाजप कार्यकर्ते, रवी पाटील यांचे समर्थक उपस्थित होते.

Tags: