Belagavi

लक्ष्मी हेब्बाळकर जिथे जातील तिथे यात्रेसारखी गर्दी; सर्व भागात एकमुखी समर्थन

Share

बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी कंग्राळी खुर्द आणि कंग्राळी बुद्रुक गावात जोरदार प्रचार केला.
निवडणूक जवळ येईल तसा प्रचाराला वेग येत आहे. जत्रेप्रमाणे जमलेल्या लोकांना घेऊन आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी गावा-गावातील गल्लीबोळात रोड शो केला. त्या काही अंतर वाहनाने तर पुढचे अंतर पायी चालत होत्या. लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यासोबत नजर जाईल तिथपर्यंत लोकांचा ओघ होता.

हे सर्व रस्ते मी गेल्या ५ वर्षात केले आहेत. तुम्ही सांगितलेली सर्व कामे मी केली आहेत. म्हणून मी तुम्हाला हक्काने मतं मागत आहे. गेली ५ वर्षे माझ्यासोबत तेवढ्याच प्रेमाने आहेस. मी आमदार आणि तुम्ही मतदार ही भावना आमच्या मनात नाही. आम्ही – तुम्ही सर्व एक कुटुंब आहोत. घरची मुलगी म्हणून मिळालेल्या सत्तेच्या संधीने विकास करणे हे माझे कर्तव्य आहे हे समजून मी हे केले आहे. आगामी काळात अधिक वेगाने विकास करूया. मोठे प्रकल्प आणून मतदारसंघाची प्रतिमा आणि मतदारसंघातील तरुणांचे जीवन बदलूया असे लक्ष्मी हेब्बाळकर यावेळी म्हणाल्या.


राजहंसगड किल्ल्याचा विकास करण्याचे, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा देशातील सर्वात मोठा पुतळा तिथे बसवावा हे माझे मोठे स्वप्न होते. ते मी कर्तव्याच्या भावनेने पार पाडले आहे. मात्र काहींनी त्यावर राजकारण करण्याचा प्रयत्न केला. मतदारसंघातील सर्व लोकांना ते समजले आणि लोक माझ्या मागे उभे राहिले. समारंभाचे उद्घाटन करताना तुम्ही सर्वांनी लाखोंच्या संख्येने येऊन मला प्रोत्साहन दिले. आता राजहंसगड हे दोन्ही राज्यातील सर्वात सुंदर पर्यटन स्थळ म्हणून विकसित झाले आहे. दररोज हजारो पर्यटक येत आहेत. याचा उपयोग नाही का, असा सवाल लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केला.

एक महिला, पहिल्यांदा आमदार म्हणून विरोधी पक्षात राहून इतके विकास प्रकल्प आणणे किती कठीण गेले असेल याची कल्पना करा. काही लोकांनी मला विनाकारण त्रास देऊन क्षेत्राच्या विकास योजना रोखण्याचा प्रयत्न केल्याचेही तुम्ही सर्वांनी पाहिले आहे. जोपर्यंत तरुणांच्या हाताला रोजगार मिळत नाही, मतदारसंघात उच्च दर्जाची आरोग्य सेवा मिळेपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले. 10 मे रोजी विधानसभा निवडणुकीत माझ्या फोटोच्या बॅलेट युनिट क्रमांक 4 मधील हाताच्या चिन्हासमोरील बटण दाबून मला आशीर्वाद द्या अशी विनंती लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केली.

Tags: